
तपशील
या योजनेद्वारे नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास, त्यांच्या विधवा किंवा विधुरास ₹२४,०००/- प्रति वर्ष इतकी अर्थिक मदत ५ वर्षांपर्यंत दिली जाते.
लाभ
- ₹२४,०००/- प्रतिवर्ष
- कालावधी: जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंत
पात्रता
- अर्जदार मृत बांधकाम कामगाराचा विधवा किंवा विधुर असावा.
- मृत कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असावा.
अर्ज प्रक्रिया (ऑफलाईन)
- अर्जदाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करावा.
- अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती भरावी व स्व-प्रमाणित आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
- भरलेला अर्ज व कागदपत्रे कामगार आयुक्त किंवा शासकीय कामगार अधिकारी यांच्याकडे सादर करावेत.
- अर्ज सादर करताना पावती/प्राप्तीपत्र मागवावे, ज्यामध्ये अर्ज सादर केल्याची तारीख, वेळ आणि युनिक ओळख क्रमांक (असल्यास) नमूद केलेले असावे.
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो
- आधार कार्ड
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्र
- बँक पासबुक
- मृत्यू प्रमाणपत्र (प्रमाणित वैद्यकीय प्राधिकाऱ्यांकडून)
- निवासाचा पुरावा (खालीलपैकी कुठलाही एक):
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- रेशन कार्ड
- मागील महिन्याचे वीज बिल
- ग्रामपंचायत प्रमाणपत्र