Posted on Leave a comment

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना

(२०१७-१८ पासून लागू, २०२६-२७ पर्यंत विस्तार)
(शासन निर्णय दिनांक १७ मे २०२२अनुसार)

योजनेचे उद्दिष्ट:

  1. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांद्वारे शेती उत्पादनामध्ये मूल्यवर्धन घडवून आणणे.
  2. ऊर्जा बचत व अन्न उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रकल्पांचे आधुनिकीकरण करणे.
  3. प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांचे प्रचार, बाजारपेठ विकास आणि निर्यातीस प्रोत्साहन.
  4. कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे.
  5. ग्रामीण भागात लहान व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योग स्थापनेस प्राधान्य देऊन रोजगारनिर्मिती.

योजनेचे लाभ:

या योजनेअंतर्गत तीन मुख्य घटक समाविष्ट आहेत:

घटक क्र.१:

कृषी व अन्न प्रक्रिया युनिट्सची स्थापना, उन्नतीकरण व आधुनिकीकरण.

घटक क्र.२:

कोल्ड चेन
पूर्व प्रक्रिया केंद्रे व एकात्मिक कोल्ड चेन संदर्भातील अन्न प्रक्रिया प्रकल्पांची स्थापना.

घटक क्र.३:

आर्थिक सहाय्य:

  • ३०% अनुदान प्रक्रिया युनिटच्या कारखाना इमारत बांधकामासाठी व यंत्रसामग्रीसाठी (कमाल मर्यादा ₹५०.०० लाख).
  • क्रेडिट लिंक्ड बॅक एंडेड सबसिडीच्या स्वरूपात २ समान टप्प्यांत अनुदान देण्यात येईल:
    1. प्रकल्प पूर्ण झाल्यावर
    2. पूर्ण व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यावर
  • कर्जाची रक्कम अनुदानाच्या किमान १.५ पट असावी.

पात्रता निकष:

  • लाभार्थ्याचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • आधार कार्ड / पॅन कार्ड असणे आवश्यक.
  • चांगला बँक CIBIL स्कोअर असावा.
  • ७/१२, ८अ उतारा किंवा भाडेकरार कागदपत्र आवश्यक.

अर्ज प्रक्रिया (ऑफलाइन):

  1. उद्योजक अर्जदार प्रकल्प प्रस्ताव बँकेच्या कर्ज मंजुरीसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करतो.
  2. प्रकल्पाचा पूर्व-अभ्यास उपसंचालक कृषी व इतर अधिकाऱ्यांमार्फत केला जातो.
  3. जिल्हास्तरीय प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या शिफारसीनंतर प्रकल्पाची प्राथमिक मंजुरी.
  4. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर व उत्पादन सुरू झाल्यावर, अनुदान बँकेच्या राखीव निधी खात्यात जमा करण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे:

  1. लाभार्थीचा अर्ज (परिशिष्ट II)
  2. बँक कर्ज मंजुरी पत्र (मूळ)
  3. बँक मूल्यांकन अहवाल (मूळ)
  4. ७/१२, ८-अ उतारा किंवा करार
  5. आधार कार्ड व पॅन कार्ड
  6. उद्योग नोंदणी प्रमाणपत्र (Udyam)
  7. सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR)
  8. प्रकल्पाच्या प्रक्रिया व उत्पादनाचे फ्लो चार्ट
  9. प्रकल्प बांधकामासाठी नोटरी अ‍ॅग्रीमेंट (परिशिष्ट III)
  10. बांधकाम नकाशा (बँकेच्या शिफारशीसह)
  11. बांधकाम अंदाजपत्रक (बँकेच्या शिफारशीसह)
  12. यंत्रसामग्रीचे कोटेशन (बँकेच्या शिफारशीसह)
  13. प्रकल्प पूर्व-भविष्य अभ्यास अहवाल (परिशिष्ट V)
  14. जिल्हास्तरीय प्रकल्प अंमलबजावणी समितीचे शिफारस पत्र (परिशिष्ट VI)
  15. मागील ३ वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल (उन्नतीकरण/विस्तार प्रकल्पासाठी)