
महाराष्ट्र शासनाची आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना
योजनेचा उद्देश:
या योजनेचा उद्देश आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे व त्यांच्या शैक्षणिक खर्चात मदत करणे आहे. शिक्षणातील असमानता दूर करून सर्व पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची समान संधी देणे हे या योजनेचे मुख्य ध्येय आहे.
लाभ:
- वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह भत्ता:
- मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद: ₹३,०००प्रतिवर्ष (१० महिने)
- इतर ठिकाणांसाठी: ₹२,०००प्रतिवर्ष (१० महिने)
- अल्पभूधारक शेतकरी/नोंदणीकृत बांधकाम कामगार यांच्या पाल्यांसाठी वसतिगृह भत्ता:
- मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद: ₹३०,००० प्रतिवर्ष (१० महिने)
- इतर ठिकाणांसाठी: ₹२०,००० प्रतिवर्ष (१० महिने)
पात्रता:
(सरकार निर्णय दिनांक ०७ ऑक्टोबर २०१७, २२ फेब्रुवारी २०१८, ०१ मार्च २०१८, १८ जून २०१८ नुसार)
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी/डोमिसाईल असावा.
- मान्यताप्राप्त तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात (डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर) प्रवेश घेतलेला “बोनाफाइड विद्यार्थी” असावा.
- केवळ CAP (Centralized Admission Process) केंद्रिय प्रवेश प्रक्रिया द्वारे घेतलेला प्रवेश ग्राह्य.
- Deemed (मानित) व खाजगी विद्यापीठाला ही योजना लागू नाही.
- अर्जदार कोणतीही इतर शिष्यवृत्ती/स्टायपेंड घेत नसावा.
- एका कुटुंबातील केवळ दोन मुलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा अधिक नसावे.
- मागील सेमिस्टरमध्ये किमान ५०% उपस्थिती आवश्यक (नवीन प्रवेशासाठी अपवाद).
- अभ्यासक्रम चालू असताना २ वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षणात खंड नसावा.
अर्ज प्रक्रिया (ऑनलाइन):
- mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा.
- New Applicant Registration वर क्लिक करून नवीन खाते तयार करा.
- Applicant Login वापरून लॉगिन करा.
- Find Eligible Scheme मध्ये आपले तपशील (धर्म, जात, उत्पन्न, विभाग – Directorate of Medical Education Research, अपंगत्व) भरून “Dr. Panjabrao Deshmukh Hostel Maintenance Allowance” योजनेकरिता अर्ज करा.
आवश्यक कागदपत्रे:
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र
- HSC आणि SSC मार्कशीट (नवीन अर्जदारांसाठी)
- पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
- मागील वर्षाचे गुणपत्रक
- शपथपत्र
- अल्पभूधारक शेतकरी/नोंदणीकृत कामगार असल्याचा तहसीलदारांकडून मिळालेला पुरावा किंवा उत्पन्न प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- विद्यार्थ्याचे PAN कार्ड (ऐच्छिक)
- वडिलांचे PAN कार्ड
- आईचे PAN कार्ड (ऐच्छिक)