Posted on Leave a comment

“औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील अनुसूचित जातीच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना”

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील अनुसूचित जातीच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

योजनेचा उद्देश:

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) तांत्रिक शिक्षणाद्वारे रोजगारासाठी सक्षम करणे.

लाभ:

वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

  • ₹६0/- प्रति महिना (तांत्रिक शिक्षण विभागाकडून)
  • ₹४0/- प्रति महिना (सामाजिक न्याय विभागाकडून)

ज्यांना वरील विभागाकडून काहीही मिळत नाही अशांसाठी

  • ₹१00/- प्रति महिना (सामाजिक न्याय विभागाकडून)

पात्रता:

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.
  • अर्जदार अनुसूचित जातीचा (SC) असावा.
  • मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) प्रशिक्षण घेतलेले असावे.
  • वडिलांचे वार्षिक उत्पन्न ₹६५,२९०/- पेक्षा कमी असावे.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • वडिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील
  • शैक्षणिक प्रमाणपत्र

अर्ज प्रक्रिया (Offline):

  1. जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (ITI) संपर्क साधा.
  2. प्राचार्य/मुख्याध्यापक यांच्याकडून मार्गदर्शन घ्या.
  3. संबंधित जिल्हा सामाजिक कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाशी संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी भेट द्या: https://mahadbt.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *